matori village firing, by tear | मातोरीत गुंडाकडून गोळीबाराचा धाक दाखवून दहशत
मातोरीत गुंडाकडून गोळीबाराचा धाक दाखवून दहशत

ठळक मुद्देकट्टयातून जीवंत काडतूस घटनास्थळी पडलेगावकऱ्यांनी एक काडतूस पोलिसांच्या हवाली केले

नाशिक : गाव शेतकरी, क ष्टकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या वेशीवरील मखमलाबाद जवळ असलेल्या या गावात सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टयाचा वापर करत दहशत माजविण्यासाठी हवेत गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जीवंत काडतुस ताब्यात घेतले आहे.गोळीबार करणारा सराईत गुंड संशयित सोमनाथ बर्वे घटनास्थळावरून फरार झाला आहे.
गावातील पाण्याच्या जलकुंभाजवळ महिला पिण्याचे पाणी घेण्यासाठी जातात. त्याठिकाणी बर्वे हा त्याच्या काही टवाळखोर मद्यपी साथीदारांसमवेत बसून ‘ओली पार्टी’ रंगविण्याचा प्रयत्न करत होता. त्यास गावकरी पांडुरंग चारस्कर यांनी पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभाजवळ बसण्यास विरोध केला असता बर्वे याने त्यांना शिवीगाळ करत काढता पाय घेतला. सोमवारी (दि.१५) सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर चारस्कर हे वाहनातून उतरत असताना बर्वे याने त्यांच्यावर हल्ला चढविला. स्वत:जवळील गावठी कट्टयाने भीती दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी कट्टयातून जीवंत काडतूस घटनास्थळी पडल्याने ते नागरिकांना आढळून आले. गावकऱ्यांनी एक काडतूस पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी चारस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपअधिक्षक शिवकुमार ढोले करीत आहेत.


Web Title: matori village firing, by tear
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.