शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आधाराश्रमात वाहतोय मातृवात्सल्याचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:27 IST

आईसारखे दैवत जगात दुसरे नाही, अशी मातृप्रेमाची महती गायली जाते. परंतु ज्या मुलांना आईचे प्रेम मिळू शकत नाही, अशा मुलांची मातृप्रेमाने काळजी घेणाऱ्या माता आधाराश्रमात दिसतात, तेव्हा आई-मुलांमध्ये येथे रक्ताचे नाते नसले तरी मायेच्या नात्याने एक वेगळाच आदर्श आजच्या समाजापुढे निर्माण झालेला दिसतो.

जागतिक  मातृदिन विशेषनाशिक : आईसारखे दैवत जगात दुसरे नाही, अशी मातृप्रेमाची महती गायली जाते. परंतु ज्या मुलांना आईचे प्रेम मिळू शकत नाही, अशा मुलांची मातृप्रेमाने काळजी घेणाऱ्या माता आधाराश्रमात दिसतात, तेव्हा आई-मुलांमध्ये येथे रक्ताचे नाते नसले तरी मायेच्या नात्याने एक वेगळाच आदर्श आजच्या समाजापुढे निर्माण झालेला दिसतो. त्यामुळे गोदाकाठावर मातृवात्सल्याचा जणूकाही झराच आधाराश्रमात वाहतोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.गोदाकाठावरील घारपुरे घाटानजीक इ.स. १९५४ मध्ये आधाराश्रमाची स्थापना झाली. इ. स. १९७० पासून या संस्थेतून आतापर्यंत ९५० मुले दत्तक देण्यात आली. त्यातील ६३ मुले ही परदेशातील जोडप्यांना दत्तक दिली गेली आहेत. मागील वर्षी २२ मुले भारतातील विविध भागातील दाम्पत्यांनी दत्तक घेतली, तर एक मूल परदेशातील जोडप्याने दत्तक घेतले आहे, अशी माहिती दत्तक समन्वयक राहुल जाधव यांनी दिली.आधाराश्रमातील शालिनी बोडके, शीला चव्हाण, ज्योती तुरे, सुनीता लांडगे आदींसह सर्वच महिला व पुरुष कर्मचारी १३२ मुला-मुलींची देखभाल करण्यासाठी सदैव कार्यरत असतात. सध्या आधाराश्रमात सुमारे ७० कर्मचारीवर्ग असून, बहुतांश महिला कर्मचारी असल्याने त्या या सर्व मुलांची मायेच्या ममतेने काळजी घेताना दिसतात. येथील मुलांचा दिनक्रम ठरलेला असतो. त्यानुसार त्यांना सकाळी आंघोळ झाल्यावर नाश्ता देणे, दुपारचे जेवण तयार करून सर्व मुलांना जेवण वाढणे, सायंकाळी पुन्हा नाश्ता, रात्री ८ वाजता पुन्हा जेवण अशा प्रकारे दिवसभर या सर्व महिलांचा कामांमध्ये वेळ जातो, परंतु मुलांच्या प्रेमापोटी त्यांना हे कष्ट वाटत नाही, उलट एकप्रकारे वात्सल्यभाव आणि समाधान त्यांच्या चेहºयावर जाणवते.वयाच्या ६ वर्षांपर्यंत मुलांना आणि वयाच्या १२व्या वर्षांपर्यंत मुलींना येथे ठेवण्यात येते. या ठिकाणी पोलिसांना सापडलेली अनाथ मुले आणि कुमारी मातांची मुले बालकल्याण समितीच्या आदेशानेच दाखल करून घेण्यात येतात. सर्व प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण करण्यात येते. या ठिकाणी आई-वडील नसलेली किंवा आई नसल्याने कुटुंब मुलांना सांभाळण्यास असमर्थ असल्यास दाखल होतात. या सर्व मुलांचा खर्च शासकीय अनुदान आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीवर शक्य होतो...अशी झाली मातृदिनाची सुरुवातजगभरात दि. १२ मे हा ‘मदर्स डे’ म्हणजे जागतिक मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसे पाहिले तर प्रत्येक दिवस हा आईचाच असतो. परंतु धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मातृदिन हा मे महिन्याच्या दुसºया रविवारी साजरा करण्यात येतो, परंतु काही देशांमध्ये तो वेगवेगळ्या तारखांनादेखील साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात अमेरिकेत झाली असून, व्हर्जिनिया प्रांतातील अ‍ॅना जार्विस नावाच्या महिलेने या दिवसाची सुरुवात केली, असे म्हटले जाते. भारतातदेखील मे महिन्याच्या दुसºया रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो.भारतीय संस्कृतीतील स्थानभारतीय संस्कृतीत मातेला देवतेचे स्थान दिले आहे. त्याचप्रमाणेच बाळाचा पहिला गुरु म्हणून आईलाच मान मिळतो. वाङमयात देखील आईची अनेक गीते, काव्य आणि कथा प्रसिद्ध आहेत. भारतीय कुटुंबपद्धतीत प्राचीन काळी मातृसत्ताक पद्धती होती. त्यामुळे निर्णयाचा अधिकार देखील मातेलाच मिळत असे.छोट्या बाळांची विशेष काळजीसर्व मुले दत्तक जाईपर्यंत आधाराश्रमात अगदी आनंदात राहतात. त्यांची काळजी घेण्यासाठी परिचारिका असून, आधाराश्रमातील कर्मचारीदेखील सदर मुलांची काळजी घेण्यासाठी धावपळ करीत आहेत.आधाराश्रमात सध्या एकूण १३२ बालके असून, या बालकांचा अत्यंत निगुतीने सांभाळ करण्यात येत आहे. त्यातील २८ मुले ही अत्यंत लहान वयोगटातील असून, त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. विशेष म्हणजे या ठिकाणी या महिन्यात दोन अत्यंत छोटी बाळे आली असून, त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेNashikनाशिक