आॅर्ट आॅफ लिव्हिंगकडून साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:35 IST2020-04-29T21:00:15+5:302020-04-29T23:35:09+5:30
सिन्नर : आगासखिंड येथील क्वॉरण्टाइन सेंटरसाठी आर्ट आॅफ लिव्हिंग परिवारातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ५० हजार रुपये किमतीचे साहित्याचे वितरण करण्यात आले.

आॅर्ट आॅफ लिव्हिंगकडून साहित्य
सिन्नर : आगासखिंड येथील क्वॉरण्टाइन सेंटरसाठी आर्ट आॅफ लिव्हिंग परिवारातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ५० हजार रुपये किमतीचे साहित्याचे वितरण करण्यात आले.
शताब्दी इंजिनिअरिंग कॉलेज येथे क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्याकरिता तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी प्रल्हाद बिब्बे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, गटशिक्षण अधिकारी मंजूषा साळुंखे यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, केंद्रप्रमुख, ग्रामपंचायत कर्मचारी यांची पूर्वतयारीची बैठक पार पडली. त्यावेळी आवश्यक साधनसामग्री करिता स्वयंसेवी संस्थांची मदत मिळवून क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर विंचूर दळवीचे ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी आर्ट आॅफ लिव्हिंगचे
महाराष्ट्र समन्वयक विजय हाके, राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याकामी साहित्य
देण्यात आले.