अन्यायाच्या विरोधात मातंग समाजाचा नाशिकमध्ये मोर्चा
By श्याम बागुल | Updated: August 29, 2018 15:41 IST2018-08-29T15:38:39+5:302018-08-29T15:41:55+5:30
गोल्फ क्लब मैदानावरून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. तत्पुर्वी जिल्ह्यातील कानाकोपºयातून शेकडो वाहनांनी सकाळपासूनच मातंग बांधवांनी मैदानावर गर्दी केली होती. ‘जय लहूजी’ लिहीलेले दुपट्टे, पिवळे ध्वज हातात घेवून निघालेला मोर्चा त्र्यंबक नाक्यावरून जिल्हा परिषद मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर

अन्यायाच्या विरोधात मातंग समाजाचा नाशिकमध्ये मोर्चा
नाशिक : राज्यात मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ व संविधानाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी बुधवारी मातंग समाजाने शक्तीप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अॅट्रासिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी व मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
गोल्फ क्लब मैदानावरून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. तत्पुर्वी जिल्ह्यातील कानाकोपºयातून शेकडो वाहनांनी सकाळपासूनच मातंग बांधवांनी मैदानावर गर्दी केली होती. ‘जय लहूजी’ लिहीलेले दुपट्टे, पिवळे ध्वज हातात घेवून निघालेला मोर्चा त्र्यंबक नाक्यावरून जिल्हा परिषद मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर नेण्यात आला. त्याठिकाणी साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बी. डी. भालेकर मैदानावर मोर्चा विसर्जित करण्यात येवून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जावून मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने महाराष्टÑातील प्रत्येक जिल्ह्यात मातंग समाजातील व्यक्तीं, मुलींवर अत्याचार करण्यात आला असून, मारेकºयांना कठोर शासन करावे, मनुस्मृतीचे समर्थन करणारे संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, अॅट्रासिटी कायद्याची कठोर अंमलबजाावणी करण्यात यावी, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सर्व मंजुर शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, साठे महामंडळाचे भाग भांडवल वार्षिक एक हजार कोटी करण्यात यावी, साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, मातंग समाज, मांग-गारूडी समाज यांचे सर्व्हेक्षण करून त्यांना दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात राजुभाऊ वैरागर, संतोष अहिरे, यु.के. अहिरे, सचिन नेटारे, सुनील अहिरे, अशोक साठे, यशवंत शिरसाठ, राजु कांबळे, गोपाळ बस्ते, साहेबराव श्रृंगार, ओंकार सपकाळे, सुर्यकांत भालेराव, विठ्ठल नाडे, अनिल निरभवणे यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते.