शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 5:16 PM

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : नेत्यांचे दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त; पाणी टंचाईची भिती

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे. कमी पर्जन्यमानामुळे अनेक गावांमध्ये आता पासुनच पाणी टंचाई जाणवत आहे. तसेच अवघे ७१ टक्केच भरलेल्या मुकणे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे आवर्तन सुरु आहे, त्यामुळेच या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांच्या तोंडचे पाणि पळाले आहे.जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध झाला होता, मात्र कोर्टाच्या आदेशानुसार ५ नोव्हेबरला दारणा, मुकणे धरणातून हजारो द.ल.घ.फु. पाणी जायकवाडीला सोडण्यात आले. दारणा धरणातून - २८४२ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून ३६४ द.ल.घ.फु. पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मात्र दारणा धरणातून आज पर्यंत ३२७८ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून १५ नोव्हेबर पासून ते आजपर्यंत तब्बल पाच पट म्हणजेच १६०७ द.ल.घ.फु. पाणी वैजापूर एक्सप्रेस कॅनॉलसाठी सोडण्यात आलेले असुन अजूनही दोन तीन दिवस हे पाणी सुरुच राहणार आहे. दारणा धरणात फक्त २३९० द.ळ.घ.फु. तर मुकणे धरणात फक्त ३०६२ द.ल. घ.फु. पाणीसाठा शिल्लक राहिले आहे.दरम्यान जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध करणाºया नेत्यांना मात्र महीन्याभरपासुन या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होणारे पाणी दिसत नाही का? ते आज का गप्प आहेत? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. आताच मुकणे धरणाचा साठा कमी झाल्याने पाइप जोडून विद्युत पंप शेतकºयांना पाण्यापर्यंत पोहोचवावे लागत आहेत. तेंव्हा उन्हाळ्यात तर परिस्थिती अधिक भयानक होईल असे शेतकरी बोलत आहेत........विशेष म्हणजे याच मुकणे धरणातून नाशिक शहरासाठी ही पाणी उचलण्यात येणार असून त्याच्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जर नाशिकचे पाणी राखीव ठेवले तर शेतकºयांना किती पाणी मिळणार हा ही एक प्रश्न आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्याबरोबरच नाशिक शहरालाही पाणी टंचाइस सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास इगतपुरी तालुक्याला तीव्र पाणी टंचाईची भिती वाटू लागली आहे.