शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या चौपाटीवर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; अग्निशमन दलाचा जवान भाजला 

By अझहर शेख | Updated: April 30, 2024 16:48 IST

सिडको परिसरातील लेखानगर येथे महामार्गावरील उड्डाणपूलाला लागून समांतर रस्त्यालगत चायनीज विक्रेत्यांनी अनधिकृतपणे चौपाटी थाटली आहे.

नाशिक  : सिडको अग्निशमन दलाच्या उपकेंद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लेखानगर चौपाटीवरील चायनीज विक्री करणाऱ्या हातगाड्यांपैकी तीन हातगाड्यांना मंगळवारी (दि.३०) मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवित असताना अचानकपणे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. जोरदार प्रेशरमुळे फायरमन राजेश जयराम हाडस (४५,रा. गणेश कॉलनी, उत्तमनगर) हे दुरवर फेकले गेले व आगीच्या ज्वालांनी त्यांना वेढल्याने ते गंभीररित्या भाजले आहे. तसेच यावेळी मदतकार्यासाठी पुढे आलेले राहुल गणोरे, अमोल खंदारे हे नागरिकही जखमी झाले आहेत.

सिडको परिसरातील लेखानगर येथे महामार्गावरील उड्डाणपूलाला लागून समांतर रस्त्यालगत चायनीज विक्रेत्यांनी अनधिकृतपणे चौपाटी थाटली आहे. मंगळवारी २ वाजून ५१ मिनिटाला आग लागल्याचा ‘कॉल’ सिडको अग्निशमन दलाच्या केंद्राला दुरध्वनीवरून प्राप्त झाला. यानंतर तत्काळ बंबासह जवान लीडींग फायरमन अविनाश सोनवणे, राजेश हाडस, कांतीलाल पवार, बंबचालक इस्माइल काझी, प्रशिक्षणार्थी यश वझरे, पार्थ शिंदे हे घटनास्थळी पोहचले. त्यावेळी किसन थापा यांच्या मालकीची चायनिज विक्रीची हातगाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दुकानांवर पाण्याचा मारा करत आग विझविण्यास सुरूवात केली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी हे केंद्रप्रमुख प्रदीप परदेशी यांनी धाव घेतली होती. आगीने रौद्रावतार धारण करू नये, यासाठी तातडीने दुसऱ्या बंबासह जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवानांनी पुढील अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिलीप ठाकुर यांच्यासह रात्रीचे गस्तीपथकही घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकfireआगCylinderगॅस सिलेंडर