शाळकरी मुलींनी स्वत: बनवले मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 14:04 IST2020-03-28T14:04:28+5:302020-03-28T14:04:59+5:30
येवला : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सुरक्षेसाठी वापरावयाच्या मास्कचा तुटवडा जाणवत असून मास्कचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तर काही ठिकाणी जादा दराने मास्कची विक्र ी होत असल्याच्याही बातम्या येत आहेत. येवले शहरात मात्र दोघा शाळकरी मुलींनी स्वत: मास्क शिवून ते कर्तव्यावर असणाºया पोलीस कर्मचारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिले आहेत.

शाळकरी मुलींनी स्वत: बनवले मास्क
येवला : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सुरक्षेसाठी वापरावयाच्या मास्कचा तुटवडा जाणवत असून मास्कचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तर काही ठिकाणी जादा दराने मास्कची विक्र ी होत असल्याच्याही बातम्या येत आहेत. येवले शहरात मात्र दोघा शाळकरी मुलींनी स्वत: मास्क शिवून ते कर्तव्यावर असणाºया पोलीस कर्मचारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिले आहेत. येवलेकर तसे सामाजिक बांधिलकी जपण्यात नेहमीच अग्रेसर असतात. कोणतीही आपत्ती आली तरी धिराने सामोरे जात एकमेकांची काळजी घेत सहाय्य करण्याची उपजत प्रवृत्तीच येवलेकरांमध्ये आहे. कोरोनाच्या उद्भवलेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या पाशर््वभूमीवर येवले शहरातील गायत्री वखारे, भाग्यश्री वखारे या दोघा शाळकरी मुलींनी स्वत: शिवून मास्क तयार केले. २४ तास जनसुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचारी व वैद्यकीय कर्मचाºयांना कृतज्ञता व्यक्त करत भेट दिले. याकामात त्यांना कुटुंबीयांची मदत झाली. शाळकरी मुलींच्या या उपक्र माने, जाणीवेने पोलिस व वैद्यकीय कर्मचारी भारावून गेले होते.