पाळे येथील ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:01 IST2020-04-20T23:01:24+5:302020-04-20T23:01:39+5:30

पाळे बु।। येथे स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थींना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख व सोमेश्वर ग्रामसंघ महिला गट यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

Mask, sanitizer, to the villagers of Pale | पाळे येथील ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर

पाळे येथील ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर

कळवण : पाळे बु।। येथे स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थींना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख व सोमेश्वर ग्रामसंघ महिला गट यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रतिमाणसी ५ किलो तांदूळ वाटप सुरू आहे. यावेळी माजी उपसरपंच पुष्पा गायकवाड, कविता अहिरराव, धनश्री परदेशी, मनीषा आहेर, मनीषा चव्हाण, कल्पना देशमुख, पोलीसपाटील लक्ष्मण देशमुख, उपसरपंच सुनील देशमुख, तंटामुक्तीचे अध्यक्ष सतीश देशमुख, मंडळ अधिकारी बागुल, तलाठी प्रकाश चव्हाण, ग्रामसेवक रवींद्र ठाकरे, स्वस्त धान्य दुकानदार शंकर देशमुख, शेखर देशमुख, दशरथ पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Mask, sanitizer, to the villagers of Pale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.