मसाप नाशिकरोड शाखेला लाखे पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:20 IST2019-05-29T23:48:43+5:302019-05-30T00:20:04+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

 Masapav Nashik Road Branch has won the award | मसाप नाशिकरोड शाखेला लाखे पुरस्कार प्रदान

मसाप नाशिकरोड शाखेला लाखे पुरस्कार प्रदान

नाशिक : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र व रोख रक्कम आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन शाखेला गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, इस्त्राईलच्या साहित्यिक नोहा मस्सील, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रभारी कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. अवघ्या चार वर्षांत शाखेने राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे. नाशिकरोड शाखेच्या महिला सदस्या कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, सुजाता हिंगे, रेखा पाटील, मंगला सातभाई, संगीता पाटील, वृंदा देशमुख व सुमन हिरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महिलांनी पुरस्कार स्वीकारण्याच्या संकल्पनेचे प्रभारी कार्यवाह प्रकाश पायगुडे व मिलिंद यांनी कौतुक केले. यावेळी शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई तसेच दशरथ लोखंडे व शिवाजी म्हस्के, पांडुरंग चव्हाण, वसंत पाटील, अनिल गुरव, रामचंद्र शिंदे, योगेश कापडणीस आदी उपस्थित होते.

 

Web Title:  Masapav Nashik Road Branch has won the award