नाशिक : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील ताडमेटलाच्या जंगलात शोधमोहिमेवर निघालेल्या सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो बटालियनच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी धोक्याने भुसुरुंग स्फोट घडवून आणला. यामुळे तुकडीचे असिस्टंट कमान्डंट व नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) सकाळच्या सुमारास ही बातमी पसरताच नाशिक जिल्ह्यासह अवघा देश शोकमग्न झाला. सोशलमिडियावर शहीद नितीन यांचे फोटा व श्रध्दांजलीपर संदेश व्हायरल होऊ लागल्याने नेटीझन्स गहिवरल्याचे दिसून आले.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील ताडमेटलाच्या जंगलात शोधमोहिमेवर निघालेल्या सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो बटालियनच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी धोक्याने भुसुरुंग स्फोट घडवून आणला. यामुळे तुकडीचे असिस्टंट कमान्डंट व नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले.