शहीद नितीन यांच्या मृत्युने गहिवरला सोशलमिडिया; अंगणात युवतींनी काढल्या रांगोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:17 PM2020-11-29T16:17:49+5:302020-11-29T16:28:05+5:30

नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले. 

Martyr Nitin's death sparks social media; Rangoli in the courtyard | शहीद नितीन यांच्या मृत्युने गहिवरला सोशलमिडिया; अंगणात युवतींनी काढल्या रांगोळ्या

शहीद नितीन यांच्या मृत्युने गहिवरला सोशलमिडिया; अंगणात युवतींनी काढल्या रांगोळ्या

googlenewsNext
ठळक मुद्देनक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणलानिफाड तालुक्यातील देवपूर येथील रहिवासी 

नाशिक : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील ताडमेटलाच्या जंगलात शोधमोहिमेवर निघालेल्या सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो बटालियनच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी धोक्याने भुसुरुंग स्फोट घडवून आणला. यामुळे तुकडीचे असिस्टंट कमान्डंट व नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) सकाळच्या सुमारास ही बातमी पसरताच नाशिक जिल्ह्यासह अवघा देश शोकमग्न झाला. सोशलमिडियावर शहीद नितीन यांचे फोटा व श्रध्दांजलीपर संदेश व्हायरल होऊ लागल्याने नेटीझन्स गहिवरल्याचे दिसून आले.

 छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील ताडमेटलाच्या जंगलात शोधमोहिमेवर निघालेल्या सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो बटालियनच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी धोक्याने भुसुरुंग स्फोट घडवून आणला. यामुळे तुकडीचे असिस्टंट कमान्डंट व नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले. 

नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. भालेराव हे कोब्रा बटालयिन-२०६मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. भालेराव हे मूळ निफाड तालुक्यातील देवपूर येथील रहिवासी आहेत. सध्या ते नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्यास होते.

Web Title: Martyr Nitin's death sparks social media; Rangoli in the courtyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.