छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 01:47 IST2018-10-19T01:46:53+5:302018-10-19T01:47:44+5:30
ढकांबे येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, विवाहितेस तिचा नवरा, सासू, दीर आदी सासरच्या मंडळीनी हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत विवाहितेच्या आईने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी नवरा, सासूसह सात जणांविरु द्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
दिंडोरी : तालुक्यातील ढकांबे येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, विवाहितेस तिचा नवरा, सासू, दीर आदी सासरच्या मंडळीनी हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत विवाहितेच्या आईने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी नवरा, सासूसह सात जणांविरु द्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ढकांबे येथील विवाहिता सोनाली गोकुळ बोडके (वय १९) हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत सोनालीची आई लता सोमनाथ लहाने (रा. सोनगिरी ता. सिन्नर) हिने दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मयत विवाहितेचा लग्न झाल्यानंतर सोनालीस हुंड्याच्या पैशांसाठी शारीरीक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करणेस भाग पाडले. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे करीत आहे.