शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

घराला लागलेल्या आगीत विवाहितेचा भाजून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:00 IST

गंजमाळजवळील पंचशीलनगर झोपडपट्टीतील एका घरास बुधवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत सुनीता योगेश लाहोटी (३०, रा़ मारवाडी गल्ली, भगूर) या विवाहितेचा भाजून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिवाळीनिमित्त आत्याला भेटण्यासाठी आलेल्या भाचीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक : गंजमाळजवळील पंचशीलनगर झोपडपट्टीतील एका घरास बुधवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत सुनीता योगेश लाहोटी (३०, रा़ मारवाडी गल्ली, भगूर) या विवाहितेचा भाजून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिवाळीनिमित्त आत्याला भेटण्यासाठी आलेल्या भाचीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आगीचे कारण आद्याप समजू शकले नाही.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर झोपडपट्टीत भागूबाई आव्हाड यांचे घर आहे़ लाकडी फळ्या व पत्रे यांच्या साहाय्याने हे घर बनविण्यात आले असून, मंगळवारी रात्री (दि़१३) त्यांची भाची सुनीता लाहोटी ही दिवाळीनिमित्त त्यांना भेटण्यासाठी आली होती़ बुधवारी (दि़१४) दुपारी एक वाजेच्या सुमारास भाची सुनीता ही घरात असल्याने भागूबाई आव्हाड या भाजी आणण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या़ या कालावधीत अचानक त्यांच्या घराला आग लागली़या आगीमुळे लाकडी फळ्या, घरातील कपड्यांनी पेट घेतल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले व शेजारी असलेल्या लाकडी घरांनीही पेट घेतला़ पंचशीलनगर झोपडपट्टीतील आव्हाड यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने चौकात उभे असलेले छोटू भालेराव, कुणाल पवार, जावेद खान यांनी घराकडे धाव घेतली़शेजारच्या घरांतील हजारोंचे साहित्य जळालेभागूबाई आव्हाड यांच्या घराला लागूनच रत्ना मोरे, प्रकाश जाधव, रेणुका नेमाने, सुनील पालवे यांची घरे असून, त्यासाठी लाकडाचा अधिक वापर करण्यात आलेला आहे़ आव्हाड यांच्या घराला लागलेली आग शेजारच्या घरांनाही लागल्याने त्यामध्ये घरातील डबे, कपडे, टीव्ही आदी हजारो रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत़ यामुळे महापालिकेकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केली आहे़अकरा महिन्यांपूर्वीच विवाहसुमारे अकरा महिन्यांपूर्वीच सुनीता यांचा विवाह योगेश लाहोटी यांच्यासोबत झाला होता़ तर त्यांच्या सासूबार्इंचे अकरा दिवसांपूर्वीच निधन झाले आहे़ घरातील मंडळी सासूच्या उत्तरकार्याची तयारी करीत होती़ तर दिवाळीनिमित्त सुनीता लाहोटी या मंगळवारी रात्री आत्या भागूबाई आव्हाड यांना भेटण्यासाठी पंचशीलनगरमध्ये आली होती़ मात्र, दुसऱ्या दिवशी घराला आग लागली व त्यामध्ये सुनीता लाहोटी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला़

टॅग्स :Fairजत्राDeathमृत्यूNashikनाशिक