लासलगाव : दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या विवाहितेचा विनयभंग करून तिला धमकावणाऱ्या डॉ. मोहंमद नशीर मोहंमद उस्मान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, लासलगाव येथील सर्व्हे नंबर ९३ मध्ये असलेल्या आयशा आयुर्वेदिक युनानी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका छत्तीस वर्षीय विवाहितेला डॉ. मोहंमद नशीर मोहंमद उस्मान याने हात पकडून लज्जास्पद मागणी करीत तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर संतापलेल्या त्या महिलेने डॉक्टराच्या थोेबाडीत मारली. त्याचा राग येऊन त्याने दिला धमकी दिली. विवाहितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, फिर्यादीनुसार लज्जास्पद मागणी करून विनयभंग करून महिलेला धमकावणारा डॉ. मोहंमद नशीर मोहंमद उस्मान (रा. गणेशनगर, लासलगाव) याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. सी. जोपुळे करीत आहेत.
लासलगावी डॉक्टरकडून विवाहितेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:34 IST