न्मेनरोड परिसरातील बाजारपेठा आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:26 IST2020-06-20T23:25:28+5:302020-06-20T23:26:18+5:30

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील मेनरोड परिसरातील बाजारपेठा रविवारपासून (दि.२१) बंद ठेवण्याचा निर्णय स्वेच्छेने व्यापारी आणि हॉकर्सच्या संघटनांनी घेतला आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारचा ‘जनता कर्फ्यू’च्या धर्तीवर निर्णय घेण्यात आला आहे.

Markets in the Main Road area are closed from today | न्मेनरोड परिसरातील बाजारपेठा आजपासून बंद

न्मेनरोड परिसरातील बाजारपेठा आजपासून बंद

ठळक मुद्देमेनरोड, शालिमार आणि जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील मेनरोड परिसरातील बाजारपेठा रविवारपासून (दि.२१) बंद ठेवण्याचा निर्णय स्वेच्छेने व्यापारी आणि हॉकर्सच्या संघटनांनी घेतला आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारचा ‘जनता कर्फ्यू’च्या धर्तीवर निर्णय घेण्यात आला आहे.
मेनरोड, शालिमार आणि जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळले असून, हा भाग सील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढून धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शनिवारी (दि.२०) यासंदर्भात माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ व राजेंद्र बागुल यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व्यापारी आणि विक्रेत्यांची बैठक झाली. पोलीस निरीक्षक साजन सोनवणेदेखील यावेळी उपस्थित होते. यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी येत्या रविवारपासून (दि.२१) आठ दिवस म्हणजेच दि. २८ जूनपर्यंत बाजारपेठा स्वेच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सराफ बाजारासह अन्य सर्वच व्यावसायिक सहभागी होणार आहेत. दरम्यान, किराणा व्यवसाय अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सोमवार ते बुधवार तीन दिवस बाजार बंद ठेवण्यात येणार आहे, असे किराणा व्यापारी असोसिएशनचे प्रफुल्ल संचेती यांनी दिली. बैठकीस नरेश पारख, अतुल मानकर, चेतन राजापूरकर, अमर सोनवणे, संदीप आहेर, सतीश धटिंगण तसेच हॉकर्स युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Markets in the Main Road area are closed from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.