लोणच्यासाठीच्या कैर्‍या बाजारात दाखल

By Admin | Updated: May 10, 2014 00:02 IST2014-05-09T22:48:13+5:302014-05-10T00:02:13+5:30

नाशिक : लोणच्यासाठी आवश्यक अशा विविध प्रकारच्या कैर्‍यांची शहरातील बाजारपेठेत आवक सुरू झाली असून, घरोघरी लोणचे तयार करण्याची लगबग वाढली आहे. कैरीसह मिरची, मसाला, तेल यांनाही मागणी होऊ लागली आहे़

In the market for pickle picking | लोणच्यासाठीच्या कैर्‍या बाजारात दाखल

लोणच्यासाठीच्या कैर्‍या बाजारात दाखल

नाशिक : लोणच्यासाठी आवश्यक अशा विविध प्रकारच्या कैर्‍यांची शहरातील बाजारपेठेत आवक सुरू झाली असून, घरोघरी लोणचे तयार करण्याची लगबग वाढली आहे. कैरीसह मिरची, मसाला, तेल यांनाही मागणी होऊ लागली आहे़
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कैर्‍या दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे़ सध्या सरासरी आठशे किलो कैर्‍यांची दररोज आवक होत आहे़ पहिला पाऊस पडेपर्यंत कैर्‍या या अधिक परिपक्व होत असतात. यानंतर केलेले लोणचे अधिक काळ टिकते असे मानले जात असल्याने पहिल्या पावसानंतरच कैरी खरेदीत खर्‍या अर्थाने वाढ होते. त्यामुळे अद्याप कैर्‍यांची पाहिजे तशी विक्री होत नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले़
बाजारात दाखल झालेल्या कैर्‍या या प्रामुख्याने राजापुरी, गावरान, नीलम, तोतापुरी आदि प्रकारांतील आहेत. गावरान कैर्‍या स्थानिक, तर इतर कैर्‍यांची पेठ, करंजाळी व गुजरातमधून आवक होत आहे़ त्यांचा दर हा साधारण दीडशे ते तीनशे रु पये शेकडा असा आहे. किरकोळ विक्रेते या कैर्‍या किलोवर विकत असून, साधारणत: २० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे, तर कैर्‍या फ ोडून देण्यासाठी प्रतिकिलो दहा रुपये मजुरी आकारली जात आहे़
लोणचे साठविण्यासाठी अजूनही प्लॅस्टिक व काचेच्या बरण्यांपेक्षा चिनी मातीच्या बरण्यांना प्राधान्य दिले जाते. अशा किमान दोन ते वीस किलो आकारातील विविध बरण्या शहरातील विविध ठिकाणी प्रामुख्याने गुजरातमधून विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्या किमती या दीडशे ते सातशे रु पयांपर्यंत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कैर्‍यांच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. लोणच्यासाठी आवश्यक मिरची, विविध प्रकारचा मसाला व तेल यांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने दरवर्षीच्या तुलनेत लोणचे घालण्याचे एकूण प्रमाण कमी झाले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़

लोणच्याला पावसानंतर सुरुवात
पहिल्या पावसानंतर वातावरणात बदल होतो़ या बदलामुळे यानंतर केलेले लोणचे अधिक काळ टिक ते़ यामुळे लोणचे बनविण्यास जूनमध्ये सुरुवात होईल़ सध्या उन्हातले लोणचे व गुजराती लोकांचे गोड लोणचे बनविण्यास प्रारंभ होतो़ त्यामुळे आता कैर्‍यांची थोडीफ ार विक्री होते़ खर्‍या विक्रीला जूनमध्ये सुरुवात होईल.
- लीलाबाई काजळे, विके्रत्या

Web Title: In the market for pickle picking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.