शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या बाजारात मेथी ३ रूपये प्रतिजुडी; आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 21:01 IST

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकहून गुजरात आणि मुंबईकडे जाणारा भाजीपाला रवाना होऊ शकला नाही. परिणामी शेतकºयांना आपला माल नाशिकच्याच बाजार समितीत आणावा लागत असल्याने आवक वाढून भाजीपालच्याचे भाव चांगलेच घसरले आहे. बुधवारी मेथीला ३०० रुपये शेकडा भाव मिळाला म्हणजेच जुडी ३ रुपये प्रमाणे विकली गेली तर कोथिंबीरचे भाव १ रूपये जुडीवरून २ रूपयांपर्यत आले आहेत.

ठळक मुद्देमुंबईत पावसाने हजेरी लावल्याने बाजारात उठाव नसल्याने शेतमाल पडून होता. बुधवारी सायंकाळी झालेल्या लिलावात मेथीला शेकडा ३०० रूपये असा बाजारभाव

नाशिक : ओखी वादळामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील भाजी बाजारात पालेभाज्यांचे भाव घसरल्याने नाशिकहून मुंबईला भाजीपाला रवाना होऊ शकला नाही. परिणामी नाशिक बाजारात आवक वाढल्याने कोथिंबीरला शेकडा तीनशे म्हणजेच जुडीला तीन रूपये असा भाव मिळाला. मंगळवारी कोथिंबीर एक रूपया भावाने जुडी विकली गेली होती. बुधवारी कोथिंबीरच्या किंमतीत किंचितसी वाढ झाली.गेल्या दोन दिवसांपासून नाशिकहून गुजरात आणि मुंबईकडे जाणारा भाजीपाला रवाना होऊ शकला नाही. परिणामी शेतकºयांना आपला माल नाशिकच्याच बाजार समितीत आणावा लागत असल्याने आवक वाढून भाजीपालच्याचे भाव चांगलेच घसरले आहे. बुधवारी मेथीला ३०० रुपये शेकडा भाव मिळाला म्हणजेच जुडी ३ रुपये प्रमाणे विकली गेली तर कोथिंबीरचे भाव १ रूपये जुडीवरून २ रूपयांपर्यत आले आहेत.नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी मेथी भाजीची मोठया प्रमाणात आवक झाली मात्र ओखी वादळामुळे मुंबईत शेतमालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम नाशिकच्या स्थानिक बाजारभावावर झाला. बुधवारी सायंकाळी झालेल्या लिलावात मेथीला ३ रूपया प्रति जुडी (शेकडा ३००) रूपये असा निच्चांकी बाजारभाव मिळाला. .लागवडीचा व दळणवळणाचा खर्च देखील न सुटल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी व बुधवार सकाळपासून ढगाळ हवामान व त्यातच पावसाने हजेरी लावली होती. ओखी वादळामुळे मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने बाजारात उठाव नसल्याने शेतमाल पडून होता. त्यातच गुजरातमध्ये स्थानिक भाजीपाला उपलब्ध झाल्याने नाशिकहून गुजरातकडे जाणारा माल जाऊ शकला नाही. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने भाव घसरले. 

टॅग्स :market yardमार्केट यार्डNashikनाशिकagricultureशेतीOckhi Cycloneओखी चक्रीवादळ