पावसामुळे आठवडे बाजार झाला ठप्प

By Admin | Updated: May 29, 2014 00:44 IST2014-05-29T00:21:23+5:302014-05-29T00:44:55+5:30

पंचवटी : परिसरात आज सलग दुसर्‍या दिवशी पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. गंगाघाटावरील बुधवारच्या आठवडे बाजारावरही पावसामुळे विरजन पडले. विक्रेत्यांची धांदल उडाली, तर ग्राहकांची चांगलीच तारांबळ झाली.

The market has hit the week due to the rains | पावसामुळे आठवडे बाजार झाला ठप्प

पावसामुळे आठवडे बाजार झाला ठप्प

पंचवटी : परिसरात आज सलग दुसर्‍या दिवशी पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. गंगाघाटावरील बुधवारच्या आठवडे बाजारावरही पावसामुळे विरजन पडले. विक्रेत्यांची धांदल उडाली, तर ग्राहकांची चांगलीच तारांबळ झाली.
आज सकाळपासूनच वातावरणात असह्य असा उकाडा होता. दुपारच्या सुमारास तासभर झालेल्या पावसाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली असली तरी वादळीवार्‍याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने काही वाहनांचे नुकसान झाले. पावसाने रस्ते न्हाऊन निघाले असले तरी अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली होती. वादळीवार्‍यामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला होता.
गंगाघाटावर आज बुधवारचा आठवडे बाजार असल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी होती. अचानक पावसाचे वातावरण होऊन वादळी वारे वाहू लागल्याने अनेक विक्रेत्यांच्या पालांचे नुकसान झाले. विक्रेत्यांनी तत्काळ काळजी घेत प्लॅस्टिकच्या कागदाने सामानसुमान झाकून घेतले होते. पाऊस सुरू झाल्याने काही विक्रेत्यांची धावपळ झाली, तर ग्राहकांचीही तारांबळ उडविली. तासाभराने पाऊस उघडल्यानंतर आठवडे बाजारातील स्थिती काही वेळात पुन्हा जैसे थे झाली.
पंचवटी परिसरातील रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये चिमुकले खेळण्याचा आनंद लुटत होते. काही ठिकाणी ओल्या रस्त्यामुळे वाहने घसरल्याच्याही घटना घडल्या.

Web Title: The market has hit the week due to the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.