देवळालीतील बाजारपेठ खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:00 IST2020-05-20T22:37:23+5:302020-05-21T00:00:57+5:30
देवळाली कॅम्प : शहरासह नाशिक परिसरातील तयार कापडाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या देवळाली परिसरातील कापड व्यावसायिक हे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे बाजारपेठ बंद असल्यामुळे घरीच होते. मात्र काल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परवानगीने येथील सर्व दुकाने सुरू करण्यात आली आहेत.

कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये याकरिता सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून येथील कपड्यांची बाजारपेठ बंद होती. त्यात अनेक दुकानदारांचे यामुळे नुकसानदेखील होत होते. आगामी रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देवळालीसह नाशिकरोडच्या आजूबाजूच्या अनेक खेड्यांमधून मुस्लीम बांधवदेखील येथे कपडे खरेदी करण्यासाठी येत असतात. नाशिक, भगूर, नाशिकरोड परिसरात सर्व व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली होती.