शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 5:30 PM

नाशिक : उन्हाळ कांद्याने भावात प्रती क्विंटलने साडे तीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापार्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळले. व्यापार्यांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकर्‍यानी आज गुरुवारी सटाणा येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला.दरम्यान, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे ,सचिव ...

ठळक मुद्देसटाणा येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल दोन तासानंतर कांद्याचे लिलाव पुर्ववत दिवाळी नंतर उन्हाळ कांद्याची आवक वाढली

नाशिक : उन्हाळ कांद्याने भावात प्रती क्विंटलने साडे तीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापार्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळले. व्यापार्यांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकर्‍यानी आज गुरुवारी सटाणा येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला.दरम्यान, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे ,सचिव भास्करराव तांबे यांनी शेतकर्‍याच्या भावना समजून घेत दिवाळीमुळे व्यापार्‍याकडे मजुरांची टंचाई असल्यामुळे खरेदी केलेल्या कांद्याची विल्हेवाट लावता येत नाही. नव्याने कांदा खरेदी केल्यास शासनाला साठेबाजी दिसून येते अशा कात्रीत व्यापारी सापडल्यामुळे कांद्याचे भाव कोसळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तब्बल तासाभराने  आंदोलन मागे घेतले. सुमारे दोन तासानंतर कांद्याचे लिलाव पुर्ववत होऊ शकले.यंदा खरीप कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट झाल्यामुळे उन्हाळ कांद्याला मागणी वाढल्यामुळे भावात तेजी आली आहे. दिवाळी नंतर उन्हाळ कांद्याची आवक वाढत असली तरी भावात मात्र गेल्या तीन दिवसांपासून तेजी राहिली आहे. कांद्याने प्रती क्विंटल साडे तीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर शासनाने पुन्हा व्यापार्यांच्या साठेबाजीवर मर्यादा आणून कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज सटाणा बाजार समितीच्या आवारात व्यापार्‍यानी मजूर टंचाईमुळे दररोज दोनशे वाहनेच कांदा खरेदी करण्याची भूमिका घेतली होती. त्यात एकाच दिवसात सरासरी भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळल्याने संतप्त शेतकर्‍यानी लिलाव बंद पाडून बाजार समतिीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला.

 

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिक