बाजार समितीने गरजूंना दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 22:24 IST2020-04-06T22:20:54+5:302020-04-06T22:24:45+5:30
लासलगाव : लॉकडाउनच्या काळात कामगार, गोरगरीब कुटुंबाची होणारी अडचण लक्षात घेऊन येथील बाजार समितीतर्फे हजार कुटुंबाना सभापती सुवर्णा जगताप, जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप यांच्या हस्ते अन्नधान्य, शिधावाटप करण्यात आला. त्यात पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो तूरडाळ, मीठ, मिरची पावडर, हळद, साबण आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

लासलगाव ब्लासलगाव बाजार समितीतर्फे गरजूंना मदत देताना तहसीलदार दीपक पाटील, खंडेराव रंजवे, डी.के. जगताप, सुवर्णा जगताप, प्रकाश दायमा आदी.
ठळक मुद्दे पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो तूरडाळ, मीठ, मिरची पावडर, हळद, साबण आणि मास्कचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : लॉकडाउनच्या काळात कामगार, गोरगरीब कुटुंबाची होणारी अडचण लक्षात घेऊन येथील बाजार समितीतर्फे हजार कुटुंबाना सभापती सुवर्णा जगताप, जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप यांच्या हस्ते अन्नधान्य, शिधावाटप करण्यात आला. त्यात पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो तूरडाळ, मीठ, मिरची पावडर, हळद, साबण आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार दीपक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, प्रकाश दायमा, नंदकुमार डागा, सुरेश जैन, संतोष पलोड, अनिल ब्रह्मेचा, रमेश शिंदे, सुनीता शिंदे उपस्थित होते.