सात दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर बाजारपेठ गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 09:31 PM2020-05-26T21:31:20+5:302020-05-27T00:05:00+5:30

सिन्नर : गेला संपूर्ण आठवडा जनता कर्फ्यूचे पालन केल्यानंतर मंगळवारपासून वावी गावातील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यवसायांची वेळ निश्चित केली असून, प्रत्येक शनिवारी सामूहिक सुटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 The market boomed after a seven-day public curfew | सात दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर बाजारपेठ गजबजली

सात दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर बाजारपेठ गजबजली

Next

सिन्नर : गेला संपूर्ण आठवडा जनता कर्फ्यूचे पालन केल्यानंतर मंगळवारपासून वावी गावातील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यवसायांची वेळ निश्चित केली असून, प्रत्येक शनिवारी सामूहिक सुटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यातील मोठी व्यापारी पेठ म्हणून वावी ओळखली जाते. शिर्डी हमरस्त्यावरील महत्त्वाचे गाव असल्याने परिसरातील ३० ते ४० गावातील नागरिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. कोरोना संसर्गामुळे ग्रामस्थांनी गेला संपूर्ण आठवडा स्वयंघोषित जनता कर्फ्यू पाळल्यानंतर मंगळवारपासून गावातील दुकाने उघडण्यात आली.
भाजीबाजारातदेखील फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून. बाहेरगावाहून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना तूर्तास बंदी घालण्यात आली आहे. परिसरातील शेतकरी मात्र भाजीपाला विक्रीसाठी आणू शकणार आहेत.
सरपंच नंदा गावडे, माजी उपसरपंच तथा कोरोना समन्वय समितीचे अध्यक्ष विजय काटे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कर्पे, कन्हैयालाल भुतडा, विजय सोमाणी, राजेंद्र धूत, ग्रामविकास संघाचे अध्यक्ष विलास पठाडे, आशिष माळवे, नंदलाल मालपाणी, संजय देशमुख, संतोष जोशी, रमेश गावडे, संदीप राजेभोसले, गावातील किराणा व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते व अन्य व्यावसायिक या बैठकीला उपस्थित होते.
---------------------------------
यासाठी सायंकाळी चार वाजेपर्यंतची वेळ व्यावसायिकांनी बैठकीत निश्चित करण्यात आली. फिजिकल डिस्टन्स पाळून व्यवसाय करावा
फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून सर्वांनी व्यवसाय करावा व सायं. ४ वाजेनंतर नंतर आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडे बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थगित करण्यात आला होता. केवळ भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विकण्यास व्यावसायिकांच्या बैठकीत परवानगी देण्यात आली होती.

Web Title:  The market boomed after a seven-day public curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक