Marital suicide; Husband-in-love imprisonment | विवाहितेची आत्महत्या; पती-प्रेयसी कारागृहात
पूजा महाले

ठळक मुद्देविवाहानंतर सहा महिन्यांतच संपविली जीवनयात्रा

लोकमत न्युज नेटवर्क
वणी : प्रेयसीच्या मदतीने पतीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी दोघांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
दिंडोरी तालुक्यातील हस्ते दुमाला येथील बबनराव महाले यांनी मुलीच्या मृत्यूनंतर तिसºया दिवशी वणी पोलिसांत फिर्याद दिली होती. अभियांत्रिकीची पदवीधर असलेल्या पूजा महाले हिचा विवाह येवला येथील शेखर संजय शिंदे याच्याशी दि. १७ मे २०१९ रोजी झाला होता. विवाहानंतर त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे पूजाच्या निदर्शनास आले होते. पूजा तसेच शेखरच्या आई व बहिणीने सांगूनही त्याच्या वर्तनात बदल झालेला नव्हता. त्यानंतर शेखर व त्याच्या प्रेयसीकडून पूजाला मानसिक त्रास देणे सुरूच होते. या त्रासाला वैतागून पूजाने हस्तेदुमाला येथे माहेरी विषारी औषध सेवन केल्याने दि. ९ रोजी तिचे निधन झाले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शेखर व त्याच्या प्रेयसीवर दाखल करण्यात आला होता.
दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: Marital suicide; Husband-in-love imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.