छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या

By Admin | Updated: September 27, 2016 23:54 IST2016-09-27T23:54:00+5:302016-09-27T23:54:53+5:30

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या

Marital suicide | छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या

इगतपुरी : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने तलावात जीव देऊन आत्महत्त्या केल्याची घटना इगतपुरी येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह चार जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही संशयित फरार झाले आहेत.
शहरातील १२ बंगला, रेल्वे क्वार्टर येथे राहणारे चेतन हिरामण साळवे यांचा गौतमी यांचेसोबत दि. २६ डिसेंबर २०११ रोजी विवाह झाला होता. त्यांना आरोही (४ वर्षे) व मुलगा शौर्य (१ वर्ष) अशी अपत्ये आहेत. चारित्र्याचा संशय घेऊन सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. दि. २४ रोजी गौतमी साळवे हिच्या घरी कार्यक्र म असल्याने सर्व जण इगतपुरी येथे आल्याची माहिती तिने तिची आई भारती गरु ड (रा. अंबरनाथ) यांना भ्रमणध्वनीवरून दिली होती. दुसऱ्या दिवशी गौतमीचे मामा तिला घ्यायला घरी आले असता तिच्या सासरकडील लोकांनी आम्हाला काहीच माहीत नाही असे सांगितल्याने गौतमीचा शोध सुरू झाला. गौतमी बेपत्ता झाल्याची तक्रार इगतपुरी पोलिसांत देण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (दि. २७) गौतमीचा मृतदेह नगरपालिका तलावात मिळून आल्याने खळबळ उडाली. मुलीस आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार भारती गरुड यांनी पोलिसांत दिली. त्यावरून मृत महिलेचा पती चेतन हिरामण साळवे, दीर सचिन, सासू ताराबाई, जाऊ कोमल सचिन साळवे व नणंद वैशाली विलास डोळस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, उपनिरीक्षक महेश मांडवे, सुभाष पाटील, ए. सी. जाडर, एम. एल. बोऱ्हाडे, गणेश वराडे, विनोद गोसावी, ई. ए. गंगावणे, सत्यभामा खेताडे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Marital suicide