पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:10 IST2020-09-04T23:08:56+5:302020-09-05T01:10:14+5:30

ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढून दिल्याची तक्रार वैष्णवी नितीन बच्छाव हिने जायखेडा पोलिसात दाखल केली आहे.

Marital harassment for five lakhs | पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

सटाणा : ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढून दिल्याची तक्रार वैष्णवी नितीन बच्छाव हिने जायखेडा पोलिसात दाखल केली आहे.
जायखेडा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत वैष्णवी नितीन बच्छाव यांनी म्हटले आहे की, पती नितीन भाऊराव बच्छाव व इतर सहा जणांनी सातत्याने आपणास स्वयंपाक व्यवस्थित येत नाही. शेतीचे कामे येत नाही, असे वारंवार हिणवून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. दरम्यान, आता तू तुझ्या आईवडिलांकडून ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, अशी पैशांची मागणी करून माझ्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून मला घराबाहेर काढून दिल्याची तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Marital harassment for five lakhs