विवाहितेचा छळ; चौघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:14 IST2021-03-31T04:14:28+5:302021-03-31T04:14:28+5:30

याप्रकरणी विजया गोकुळ वैष्णव या विवाहितेने फिर्याद दिली आहे. तिचा पती गोकुळ राधाकिसन वैष्णव, बसंताबाई राधाकिसन वैष्णव, राजू राधाकिसन ...

Marital harassment; Crime against four | विवाहितेचा छळ; चौघांविरूद्ध गुन्हा

विवाहितेचा छळ; चौघांविरूद्ध गुन्हा

याप्रकरणी विजया गोकुळ वैष्णव या विवाहितेने फिर्याद दिली आहे. तिचा पती गोकुळ राधाकिसन वैष्णव, बसंताबाई राधाकिसन वैष्णव, राजू राधाकिसन वैष्णव, रामदास भगवानदास वैष्णव (रा. तळणी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार आर. ए. सोनवणे करीत आहेत.

आत्महत्येस प्रवृत्त; दोघांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : पैशांच्या व्याजासाठी दोघांनी तगादा लावल्याने त्यांच्या मानसिक छळाला कंटाळून विहिरीच्या कडेला दोरीने गळफास घेऊन शिवाजी उर्फ पप्पू रामचंद्र वैराग (मूळ रा. झाडी, ता. मालेगाव हल्ली रा. कल्याण) यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी अर्चना शिवाजी वैराग यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनसिंग राजपूत, जयपाल धनसिंग राजपूत (दोघे रा. हनुमान टेकडी, उल्हासनगर) यांनी शिवाजी वैराग यांना व्याजाने पैसे दिले होते. त्याचे व्याज थकल्याने वैराग यांचा मानसिक छळ केला जात होता. याला वैतागून त्यांनी आत्महत्या केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Marital harassment; Crime against four