मार्चचे रखडलेले वेतन अखेर मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:44+5:302021-05-05T04:24:44+5:30

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचे मार्च २०२१ चे वेतन अखेर मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाले असून ...

March's stagnant salary finally credited to the headmaster's account | मार्चचे रखडलेले वेतन अखेर मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा

मार्चचे रखडलेले वेतन अखेर मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचे मार्च २०२१ चे वेतन अखेर मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाले असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिक्षकांना अखेर दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या अन्य प्रलंबित वेतनेत्तर अनुदान आणि देयकांविषयी मागण्यांसंदर्भात चौकशी समिती नियुक्त करून हे प्रश्नही तत्काळ सोडविण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांनी शिक्षकांना दिले आहे.

शिक्षकांची पुरवणी बिले, मेडिकल बिले अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शिक्षणाधिकारी कार्यालयात पदोन्नती, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेऊनही प्रश्न निकाली निघत नसल्याची तक्रार करण्यासाठी तसेच मार्चपासून रखडलेले वेतन मिळविण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी सोमवारी (दि.३) शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते .त्यानंतर तत्काळ मुख्याध्यापकांच्या खात्यावर ८० टक्के शिक्षकांचे वेतन जमा झाले असून उर्वरित २० टक्के शिक्षकांचे वेतन तांत्रिक अडचणींमुळे होऊ शकलेले नाही. त्यांचे वेतन या सप्ताहाअखेरपर्यंत होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

- इन्फो

जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचे मार्च २०२१ चे ८० टक्के वेतन अखेर मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाले आहे. उर्वरित २० टक्के शिक्षकांच्या बाबतीत तांत्रिक उणिवा असल्याचे सांगितले जात असून लवकरत उर्वरित शिक्षकांचे वेतनही त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

- निलेश ठाकूर, सरचिटणीस, टीडीएफ, नाशिक

Web Title: March's stagnant salary finally credited to the headmaster's account