लोकशाही पंधरवडा अंतर्गत मॅरेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:54 IST2020-01-30T22:44:30+5:302020-01-31T00:54:29+5:30
श्री. नेमिनाथ जैन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्व. माजी आमदार जयचंद कासलीवाल यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अंगीकार योजना व लोकशाही पंधरवडा अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.

लोकशाही पंधरवडा अंतर्गत मॅरेथॉन
चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्व. माजी आमदार जयचंद कासलीवाल यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अंगीकार योजना व लोकशाही पंधरवडा अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या नावाने टी शर्ट परिधान करून २५ मुले व २५ मुली यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुवर्ण-रजत-कांस्यपदक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी एकहजार मीटर अंतर धावण्यात आले. गजानन कॉलनीत खासदार निधी अंतर्गत मिळालेले हायमास्ट बसविण्यात आले होते.
यावेळी हायमास्ट पोलचे दत्तात्रय वसंतराव राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. चांदवड नगर परिषद येथे माजी आमदार कासलीवाल यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी चांदवड नगर परिषदेस प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच वरचेगावातील पाटणी गल्ली येथे हायमास्टचे उद्घाटन हाजी कालू बागवान, सुरेश जाधव, गोविंद कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रेखा गवळी, जगन्नाथ राऊत, नवनाथ आहेर, मुकेश आहेर, पप्पू भालेराव, उपप्राचार्य सुरेश पाटील, संजय चौबे, मुख्याधिकारी अभिजित कदम, शेषराव चौधरी, हर्षदा राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.
मुलांमध्ये प्रथम- राहुल कृष्णा बरकले, द्वितीय क्रमांक गणेश बाळू जाधव व तृतीय क्र मांक स्वप्नील बाबाजी ठोके यांनी पटकावला. तसेच मुलींमध्ये प्रथम क्र मांक कांचन जयवंत गांगुर्डे, द्वितीय क्र मांक पल्लवी केशव घुले, तृतीय क्र मांक स्वाती गांगुर्डे यांनी पटकावला.