शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मराठी साहित्यात स्रिया अजूनही परिघावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:46 IST

चांदवड : भोवतालच्या विषमता व असहिष्णुतेबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, मात्र थोडे अंतर्मुख होण्याचीही गरज आहे. कारण मराठी साहित्यविश्वात स्रिया अजूनही परिघावरच असल्याचे परखड मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रज्ञा पवार : चांदवडला ३१ व्या मराठी परिषदेच्या राष्टÑीय चर्चासत्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : भोवतालच्या विषमता व असहिष्णुतेबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, मात्र थोडे अंतर्मुख होण्याचीही गरज आहे. कारण मराठी साहित्यविश्वात स्रिया अजूनही परिघावरच असल्याचे परखड मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले.चांदवड येथील आबड-लोढा- जैन महाविद्यालयात धुळे येथील का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेच्या सहकार्याने आयोजित ३१ व्या मराठी परिषदेच्या आणि राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘समकालीन मराठी साहित्य : प्रेरणा आणि प्रवृत्ती’ या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य जी. एच. जैन व प्रशासकीय अधिकारी प्रमोद केळकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्तविकात प्रा. डॉ. वंदना महाजन यांनी या चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री वाणी या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेचे अध्यक्ष, माजी कुलगुरु के.बी. पाटील, का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत धामणे, सचिव प्रा. डॉ. शोभा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी क्षीरसागर यांनी केले. आभार गणेश आहेर यांनी मानले.‘समकालीन मराठी कादंबरी’ या सत्रात दत्ता घोलप यांनी समकालीन मराठी कादंबरी या विषयावर निबंध सादर केला. या सत्रात कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कृष्णा खोत, अशोक कौतिक कोळी यांनी ‘समकालीन मराठी कादंबरी आणि मी’ या विषयावर अनुभव सांगितले. ‘समकालीन मराठी कथा’ या विषयावरील दुसऱ्या सत्रातील चर्चासत्रात प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी समकालीन मराठी कथा या विषयावर निबंध सादर केला. यावेळी किरण येले यांनी ‘समकालीन मराठी कथा आणि मी’ या विषयावर विचार मांडले. यानंतर डॉ राजेंद्र मलोसे यांनी समकाल आणि सर्वकाल या दोन संकल्पनांना प्रभावीपणे स्पष्ट केले. यानंतर खुले सत्र घेण्यात आले. केटीएचएम महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. दुसºया दिवशी ‘समकालीन मराठी नाटक व एकांकिका’ या विषयावर बाळकृष्ण लळीत यांनी शोधनिबंध सादर केला. सुप्रसिद्ध रंगकर्मी दत्ता पाटील यांनी ‘समकालीन नाटक व एकांकिका आणि मी’ या विषयावर अनुभव मांडले.‘समकालीन मराठी कविता’ हे सत्र कवी अशोक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. ंयात कवी पी. विठ्ठल, वीरा राठोड, अशोक कोतवाल, कवयित्री पद्मारेखा धनकर यांनी सहभाग घेतला. शेवटचे सत्र ‘समकालीन मराठी समीक्षा आणि वैचारिक साहित्य’ या विषयावर घेण्यात आले. यात अभ्यासक कैलास अंभुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शिरीष लांडगे पाटील आणि उदय रोटे यांनी सहभाग घेतला. प्रवीण बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप करण्यात आला. प्रातिनिधिक मनोगत सत्यजित साळवे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातून ८० महाविद्यालयांतील प्राध्यापक, अभ्यासक व विद्यार्थी संशोधक या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. चांदवडकर, वाणी संस्थेचे मिलिंद दीक्षित व सुनील देसले यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रा. वंदना महाजन यांनी मानले. एखाद्याने मांडलेल्या भूमिकेचा दुसºयावर परिणाम : हरिश्चंद्र थोराततो १९५० साली लिहित असला आणि आज अस्तित्वात नसला तरी माझा समकालीन ठरेल. या दृष्टिकोनातून पाहता मर्ढेकर, नामदेव ढसाळ आणि अरु ण काळे हे कवी मला केवळ एकमेकांशी नव्हे तर माझ्याशी समकालीन वाटतात. समकालीनतेची माझी संकल्पना मी फुले, लोकहितवादी यांच्यापर्यंत मागे नेतो. संस्कृती संपर्कमधून मराठी जीवनात घुसलेली आधुनिकतेची संकल्पना या आधारावर मी माझी समकालीनतेची संकल्पना उभी करतो, असेही थोरात यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक