शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मराठी साहित्यकृतींनाही नोबेल मिळू शकेलपृथ्वीराज तौर : येवल्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र; मान्यवरांच्या सहभागाने रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:19 IST

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘भाषा, साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र झाले.

ठळक मुद्देचर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका कथनसुलभीकरण म्हणजेही अनुवाद व्याप्ती व भावनिक गुंतवणूक लक्ष

येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘भाषा, साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र झाले.या चर्चासत्राचे उद्घाटन मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. गो. तु. पाटील यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाले. तर बीजभाषक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक तथा अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर यांची उपस्थिती होती. हिंदीतील बीजभाषण मंठा जालना येथील हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉ. ज्ञानेश्वर महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. चर्चासत्राचे समन्वयक डॉ. धनराज धनगर यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका कथन केली. आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रा. गो.तु. पाटील यांनी अनुवादाची संकल्पना स्पष्ट करताना एका भाषेत व्यक्त झालेला आशय दुसºया भाषेत व्यक्त करणे म्हणजे अनुवाद एवढाच अनुवाद या शब्दाचा अर्थ नाही; तर एका भाषेतून त्याच भाषेत व्यक्त केले जाणारे भाष्य, क्लिष्ट विषयाचे केले जाणारे सुलभीकरण म्हणजेही अनुवाद असतो; भावार्थ, गोषवारा, सारांश हेदेखील अनुवादच असतात, अशी अनुवाद या विषयाची व्यापकता स्पष्ट केली. बीजभाषणात डॉ. पृथ्वीराज तौर यांनी एकभाषिक आस्वादकासाठी स्वभाषेतील साहित्य हे मोठ्या खोलीसारखे असते. इतर भाषांच्या अनुवादरूपी खिडक्यांमधून एक भाषिक आस्वादक या इतर भाषांच्या साहित्याचा आस्वाद घेत असतो; मात्र बहुभाषिकांसाठी इतर भाषेची खिडकी ही खिडकी न राहता ते दार बनते. बहुभाषिक व्यक्ती त्याला ज्ञात असणाºया साहित्याचा थेट आस्वाद घेऊ शकतो. तो एका खोलीतून दुसºया खोलीत प्रवेश करतो. एकभाषिकांसाठी असणाºया मर्यादा बहुभाषिकांसाठी नसतात, अशा लालित्यपूर्ण शैलीत बहुभाषिक असण्याचे महत्त्व डॉ. पृथ्वीराज तौर यांनी पटवून दिले. हिंदीतील बीजभाषक डॉ. ज्ञानेश्वर महाजन यांनी ‘‘अनुवाद की शुरु वात मां से होती है’’ असे सांगून अनुवादाची व्याप्ती व भावनिक गुंतवणूक याकडे लक्ष वेधले. सामान शब्दाचा अनुवाद केल्याने गुलजार यांना आपले अनुवादाचे पुस्तक परत घ्यावे लागले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी ‘मोट चालते मळ्यात माझ्या चाक वाजते कुईकुई’ अशा प्रादेशिक संस्कृतीतील शब्दांचे अनुवाद करणे अशक्य ठरते असे सांगून ‘अनुवादाच्या क्षेत्रातील आव्हाने’ यावर प्रकाश टाकला. या ओळींचे अनुवाद करण्यासाठी मोट, नाडा, पखाल या संकल्पनांचे अर्थ माहीत असणेदेखील आवश्यक ठरते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा गायकवाड यांनी केले. अतिथींचा परिचय चर्चासत्राचे सहसमन्वयक प्रा. कमलाकर गायकवाड यांनी करून दिला. आभार चर्चासत्राचे दुसरे सहसमन्वयक प्रा. रघुनाथ वाकळे यांनी मानले. चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य शिरीष नांदुर्डीकर, कार्यालयीन अधीक्षक बी. यू. अहिरे, प्रा. शिवाजी गायकवाड, प्रा. अरुण वनारसे, प्रा. पंढरीनाथ दिसागज, प्रा. हर्षल बच्छाव, प्रा. डी.के. कन्नोर, प्रा. बी.एल. शेलार, प्रा. सी.एन.हिरे, प्रा. डी. व्ही. सोनवणे, प्रा. टी.एस. सांगळे, ग्रंथपाल ए.पी. बागुल, लेखापाल भालचंद्र पेंढारकर तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज प्रा. डी.बी. मामुडे, प्रा. विठ्ठल सातपुते, प्रा. अमित सोनवणे तसेच सर्व शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.