मनपाला कर आकारणी अधिकार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:53 IST2018-05-15T00:53:36+5:302018-05-15T00:53:36+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे स्वतंत्र नियोजन प्राधिकरण असल्याने उद्योगातील मोकळ्या जागेवर कर आकारणी करण्याचा महानगरपालिकेस अधिकार नसल्याचे सूतोवाच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले.

मनपाला कर आकारणी अधिकार नाही
सातपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे स्वतंत्र नियोजन प्राधिकरण असल्याने उद्योगातील मोकळ्या जागेवर कर आकारणी करण्याचा महानगरपालिकेस अधिकार नसल्याचे सूतोवाच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले. उद्योजकांनी त्यांचे स्वागत केले. मनपाकडून सेवा, सुविधा मिळाव्यात म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करावा लागत आहे. त्या सुविधा न देता विनाकारण कराची आकारणी करणे चुकीचे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका प्रशासनाने औद्योगिक वसाहतीतील कारखान्याच्या उर्वरित मोकळ्या जागेवर कराची आकारणी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांच्याकडे कैफियत मांडली असता मनपाला असा अधिकार नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले. एमआयडीसीकडून भूखंड घेतल्यानंतर भविष्याच्या नियोजनाचा (उद्योग विस्तार, अन्य कारणासाठी लागणारी जागा) विचार करावा लागतो. त्यासाठी एमआयडीसीकडे प्लॅन सादर केलेला असतो. त्यामुळे मनपा प्रशासनाने विचारपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित आहे. घरपट्टी आकारण्याचा मनपाला अधिकार आहे त्याबद्दल दुमत नाही, असेही उद्योजकांचे म्हणणे आहे.