मनपाने हटविले ६५ अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 01:48 IST2022-07-08T01:48:10+5:302022-07-08T01:48:37+5:30
मालेगाव महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या अठराव्या दिवशी प्रभाग कार्यालय क्रमांक तीनच्या कार्यक्षेत्रातील मुशावरच चौक ते मुमता चौकापर्यंत तसेच गोल्डननगर परिसर येथील ४३ , प्रभाग कार्यालय क्रमांक चारच्या कार्यक्षेत्रातील अलंकार सायजिंग ते इमान सेंडू जिमखाना येथील १२ असे एकूण ६५ अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले आहे.

मनपाने हटविले ६५ अतिक्रमणे
मालेगाव : महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या अठराव्या दिवशी प्रभाग कार्यालय क्रमांक तीनच्या कार्यक्षेत्रातील मुशावरच चौक ते मुमता चौकापर्यंत तसेच गोल्डननगर परिसर येथील ४३ , प्रभाग कार्यालय क्रमांक चारच्या कार्यक्षेत्रातील अलंकार सायजिंग ते इमान सेंडू जिमखाना येथील १२ असे एकूण ६५ अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले आहे.
ही कारवाई प्रभाग अधिकारी हरिश डिंबर, कदीर अह.अ.लतीफ, अतिक्रमण अधीक्षक श्याम कांबळे, प्रमुख संकीर्ण कर अधीक्षक सुनील खैरनार, बीट मुकादम मनोहर ढिवरे, अजय चांगरे, राजू वाघ, प्रवीण महाले, अब्दुल वाहीद, सचिन त्रिमुखे, रोहीण सोनवणे आदींनी केली.