मानोरीत जंतुनाशक औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:04 IST2021-05-05T23:30:39+5:302021-05-06T01:04:31+5:30

मानोरी : ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली आहे.

Manorite disinfectant spray | मानोरीत जंतुनाशक औषध फवारणी

मानोरी बु. येथे औषधांची फवारणी प्रसंगी कर्मचाऱ्यांसमवेत नंदाराम शेळके, विठ्ठल वावधाने आदी.

ठळक मुद्देकोरोना रुग्ण झपाट्याने वाढत

मानोरी : ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली आहे.

अंगणवाडी, ग्रामपंचायत परिसर, मंदिर परिसर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळापरिसर आदी गल्लीबोळात देखील औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.
यावेळी सरपंच नंदाराम शेळके यांनी ग्रामस्थांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी विठ्ठल वावधाने, प्रवीण जोशी,अमोल शेळके, अमोल भवर, नितीन शेळके, बाळासाहेब तिपायले, संपत चांदगुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Web Title: Manorite disinfectant spray