मुलाला पळवून नेत घाटात मारहाणपेठ : ईनामबारी येथील प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:38 IST2017-12-24T00:36:26+5:302017-12-24T00:38:49+5:30
पेठ : तालुक्यातील ईनामबारी येथील शासकीय आश्रमशाळेतील सातवी इयत्तेत शिकणाºया विद्यार्थ्यांस दोन अज्ञात इसमांनी पळवून नेत सावळघाटात मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

मुलाला पळवून नेत घाटात मारहाणपेठ : ईनामबारी येथील प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये घबराट
पेठ : तालुक्यातील ईनामबारी येथील शासकीय आश्रमशाळेतील सातवी इयत्तेत शिकणाºया विद्यार्थ्यांस दोन अज्ञात इसमांनी पळवून नेत सावळघाटात मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
शासकीय आश्रमशाळा ईनामबारी येथे सातवीत शिकणारा संतोष अरुण चौधरी हा शाळेच्या परिसरात खेळत असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरू णांनी त्यास नाव विचारून बळजबरीने गाडीवर बसवले. जवळच असलेल्या सावळघाटात नेऊन त्यास दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने कशीबशी सुटका करून तेथून पळ काढला. वाटेत भेटलेल्या प्रवाशांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी संतोषला आश्रमशाळेत आणले. सामाजिक कार्यकर्ते नंदू गवळी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पेठ पोलिसांना कळवले. पोलीसांनी आश्रमशाळेस भेट देऊन संतोषची विचारपूस केली. या प्रकारामुळे आश्रमशाळेतील मुलांची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात असून, परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.