मनमाडला थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:56 IST2019-01-02T00:55:39+5:302019-01-02T00:56:38+5:30
मनमाड : सध्या परिसरात थंडीची लाट पसरली असून वाढत्या थंडीमुळे रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली. गँगमन च्या सतर्कतेमुळे सदरचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने या मार्गावरून जाणार्या काकीनाडा एक्स्प्रेसचा अपघात टळला आहे.

मनमाडला थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे
मनमाड : सध्या परिसरात थंडीची लाट पसरली असून वाढत्या थंडीमुळे रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली. गँगमन च्या सतर्कतेमुळे सदरचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने या मार्गावरून जाणार्या काकीनाडा एक्स्प्रेसचा अपघात टळला आहे.
मनमाड रेल्वे स्थानकावर फलाट
क्रमांक पाच जवळून जाणार्या रेल्वे लाईनला तडा गेला असल्याची बाब गँगमन अमोल पगारे यांच्या निदर्शनास आली. या मार्गावरून सिकंदराबाद साईनगर काकींनाडा एक्सप्रेस रवाना होणार असल्याने पगारे यांनी प्रसंगावधान राखून वेळीच याबाबत अधिकाºयांना माहिती दिली. यामुळे काकींनाडा एक्सप्रेस काही काळ थांबवण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून या रु ळाची दुरु स्ती केली व मार्ग वाहतुकी साठी मोकळा केला. गँगमन च्या सातर्कते मुळे रेल्वेचा संभाव्य अपघात टळला आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून शहारत कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे रेल्वे रु ळाला तडा गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.