मनमाडला हमालांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:59 IST2018-03-01T00:59:09+5:302018-03-01T00:59:09+5:30
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर काम करणाºया परवानाधारक हमालांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांना ओझे खांद्यावर घेऊन जा-ये करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

मनमाडला हमालांचे कामबंद आंदोलन
मनमाड : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर काम करणाºया परवानाधारक हमालांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांना ओझे खांद्यावर घेऊन जा-ये करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष बळवंतराव आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली. बुकिंग कार्यालयासमोर हमाल लोकांनी घोेषणाबाजी करत धरणे आंदोलन सुरू केले. परवानाधारक हमालांना रेल्वे भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे, परवानाधारक ज्येष्ठ हमालांना पेन्शन योजना लागू करावी, वैद्यकीय चाचणीत अनफीट ठरलेल्या हमालांना हलक्या कामाची नोकरी देण्यात यावी, वयोवृद्ध हमालांच्या जागी त्यांच्या वारसांना सामावून घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हमाल लोकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पाठवण्यात आले आहे. आंदोलनात मुकरदम मधुकर गिते, बाळू ढोणे, अकबर शेख, संजय मोते, राजू शिंदे, सुनील पाटील, राजू इप्पर, भगवान गिते, समाधान बोडके, राहुल इप्पर, धिरज चावरीया, प्रल्हाद भोसले, अनिल गंभिरे, दीपक गवळी, जितू हिरणवाळे, शब्बीर पठाण, छगन लोकनर आदी सहभागी झाले होते.