मनमाडला दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:43 IST2020-09-02T23:54:14+5:302020-09-03T01:43:56+5:30
मनमाड : शहराच्या इदगाह भागात घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. येथील केटरिंग व्यावसायिक योगेश शर्मा यांच्या घरासमोर लावलेल्या त्यांच्या दोन दुचाकी पहाटेच्या सुमारास जळत असल्याची बाब निदर्शनास आली.

मनमाडला दुचाकी जाळल्या
ठळक मुद्दे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मनमाड येथे अज्ञातांनी जाळलेल्या दुचाकी.
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : शहराच्या इदगाह भागात घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. येथील केटरिंग व्यावसायिक योगेश शर्मा यांच्या घरासमोर लावलेल्या त्यांच्या दोन दुचाकी पहाटेच्या सुमारास जळत असल्याची बाब निदर्शनास आली.
परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मोटारसायकल जाळण्याबरोबरच रस्त्यावर लावलेल्या चारचाकी वाहनाचे टायर फाडण्यात आले आहे. याबाबत शर्मा यांनी पोलिसात तक्र ार दाखल केली आहे.