मनमाडला मिरवणुकीस फाटा; पुष्पहार अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:03 IST2020-04-14T23:11:19+5:302020-04-15T00:03:29+5:30
मनमाड पालिका प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना दिलीप मेनकर, पद्मावती धात्रक, नितीन पाटील आदी. मनमाड ...

मनमाडला मिरवणुकीस फाटा; पुष्पहार अर्पण
मनमाड पालिका प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना दिलीप मेनकर, पद्मावती धात्रक, नितीन पाटील आदी.
मनमाड : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने व घरातच साजरी करण्यात आली. पालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मनमाड येथे दरवर्षी ५० ते ५५ चित्ररथांची मिरवणूक काढण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मोठ्या प्रमाणात साजरा न करता अत्यंत साधेपणाने आपापल्या घरातच साजरा करण्यात आला.
नागरिकांनी आपल्या घरासमोर रांगोळी, घरावर निळे झेंडे, रोषणाई करत घरातच बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरातील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन दराडे, राजाभाऊ आहिरे, राजाभाऊ पगारे, गणेश धात्रक, गंगाभाऊ त्रिभुवन, संतोष बळीद, सुधाकर मोरे,
कैलास आहिरे, दिलीप नरवडे, दिनकर धिवर, गुरु निकाळे आदींनी परिश्रम घेतले.