राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 21:12 IST2019-10-23T21:10:16+5:302019-10-23T21:12:00+5:30
मनमाड : बोधगया बिहार येथे झालेल्या १५ व्या युथ व ५६ व्या जुनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतातील जवळपास २७ ...

बोधगया बिहार येथील राष्ट्रीय स्पर्धेतील मनमाड येथील यशस्वी खेळाडू
मनमाड : बोधगया बिहार येथे झालेल्या १५ व्या युथ व ५६ व्या जुनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतातील जवळपास २७ राज्यातील ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. येथील मुकुंद संतोष आहेर याने ४९ किलो वजनी गटात १८७ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. धनश्री नितीन पवार हिने ५९ किलो वजनी गटात जुनियर मध्ये १६१ किलो वजन उचलून कांस्यपदक, प्राजक्ता रवींद्र खालकर हिने ६४ किलो वजनी गटात १७४ किलो वजन उचलत कांस्यपदक, ७१ किलो वजनी गटात निकिता वाल्मिक काळे हिने १७५ किलो वजन उचलत कांस्यपदक तर करुणा रमेश गाढे हिने ७६ किलो वजनी गटात १५६ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. ४९ किलो वजनी गटात नूतन बाबासाहेब दराडे हिने उत्कृष्ट कामिगरी करीत १३८ किलो वजन उचलले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघांचे प्रशिक्षक म्हणून प्रवीण व्यवहारे तर तांत्रिक अधिकारी म्हणून एन आय एस प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाने राष्ट्रीय युथ व जुनियर मुलींचे सांघिक विजेतेपद पटकावले.
या खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, जयभवानी व्यायामशाळेचे जयराम सानप, मोहन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.