मनमाडला रेल्वेच्या धडकेत तरस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:41 IST2019-05-08T00:40:34+5:302019-05-08T00:41:09+5:30
मनमाड : पाण्याच्या शोधात अनकवाडे शिवारात आलेले तरस रेल्वेचा धक्का लागून ठार झाले.

मनमाडला रेल्वेच्या धडकेत तरस ठार
ठळक मुद्देवन कर्मचाऱ्यांनी तरसाचे शव ताब्यात घेतले.
मनमाड : पाण्याच्या शोधात अनकवाडे शिवारात आलेले तरस रेल्वेचा धक्का लागून ठार झाले. परिसरात दुष्काळ पडल्याने जंगलातील वन्यजीव तहान भागवण्यासाठी गावाकडे येत आहे. अनकवाडे वनविभागाच्या जंगल परिसरातही भीषण पाणीटंचाई आहे. पाण्याच्या शोधात शिवारात आलेले तरस रेल्वेच्या रु ळाकडून जात असताना रेल्वेचा धक्का लागून तरस ठार झाले. ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी तरसाचे शव ताब्यात घेतले.