मनमाडला इंधन टँकर चालक पुन्हा संपावर; सकाळपासून इंधन पुरवठा ठप्प 

By धनंजय वाखारे | Published: January 10, 2024 10:49 AM2024-01-10T10:49:58+5:302024-01-10T10:50:52+5:30

अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता..

manmad fuel tanker drivers on strike again fuel supply stopped since morning | मनमाडला इंधन टँकर चालक पुन्हा संपावर; सकाळपासून इंधन पुरवठा ठप्प 

मनमाडला इंधन टँकर चालक पुन्हा संपावर; सकाळपासून इंधन पुरवठा ठप्प 

लोकमत न्यूज नेटवर्क, मनमाड (नाशिक):  हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांत तीव्र भावना असून, नाशिकच्या  मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलनाचे हत्यार उपसले. मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नाही.त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे.

तर  सकाळपासून भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल  प्रकल्पातून एकही इंधना टँकर  भरून बाहेर पडला नाही. त्यामुळे इंधन पुरवठा ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच अनेक जिल्ह्यात इंधन तुडवडा होण्याची शक्यता  झाली आहे.दरम्यान या संपाची कुठल्याही  वाहतूक संघटनेने संपाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली नाही. प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: manmad fuel tanker drivers on strike again fuel supply stopped since morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.