मनमाडला आठ दिवस सलून बंद ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:05 IST2020-07-08T14:04:49+5:302020-07-08T14:05:16+5:30

मनमाड : शहरात वाढत असणाऱ्या कोरोना विषाणूचा धोका पाहता आठ दिवस सलून बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

Manmad decides to keep salon closed for eight days | मनमाडला आठ दिवस सलून बंद ठेवण्याचा निर्णय

मनमाडला आठ दिवस सलून बंद ठेवण्याचा निर्णय

मनमाड : शहरात वाढत असणाऱ्या कोरोना विषाणूचा धोका पाहता आठ दिवस सलून बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. येथील नाभिक सलून व्यवसाईक व कारागीर यांच्या श्रीसंत सेना महाराज सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला. मनमाड आणि परिसरातील नागरिक कोरोना संक्र मणापासून दूर राहावे व कोणत्याही सलून कारागीरास कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी सर्वानुमते दुकाने आठ दिवस म्हणजेच बुधवारपासून पुढच्या  बुधवार पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . त्याचप्रमाणे या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये कोणीही कोणाच्याही घरी जाऊन दाढी-किटंग करू नये सदरचा बंद हा हत्यारे बंद असा पाळण्यात यावा असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे .वरील झालेला निर्णय हा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील असे सांगण्यात आले.

Web Title: Manmad decides to keep salon closed for eight days

टॅग्स :Nashikनाशिक