ममदापुर येथील पाणी टँकरच बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 19:45 IST2019-02-14T19:45:26+5:302019-02-14T19:45:51+5:30
ममदापुर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र गेल्या आठ दिवसापासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

ममदापुर येथील पाणी टँकरच बेपत्ता
ममदापुर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र गेल्या आठ दिवसापासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
यावर्षी पावसाने दडी मारल्याने पावसाळ्यात देखील परिसरातील छोटे मोठे बंधारे कोरडे होते तसेच विहिरींना पाणीच आले नाही. त्यामुळे परिसरातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, सोमठाण जोश, कोळगाव, रेंडाळा आदी गावांना मागील बऱ्याच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.
गावातील टँकर दररोज येतो मग वाडी वस्तीवरील का येत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी व बोरवेल दोन्हीही कोरडेठाक असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्याची मोठी पंचायत झाली आहे. या परिसरातील शेतकरी हे आपल्या शेतातच राहतात. दरवर्षी शेतकºयांना पिण्यासाठी पुरेल एवढे पाणी विहिरींना असायचे किंवा बोरवेलला तरी पाणी शेतकºयांच्या कुटुंबाला व जनावरांना पिण्यासाठी पाणी असायचे, परंतु या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्यासाठी पाणी नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे हाल होत आहे. त्यामुळे शासनाने गावाबरोबरच वाडी-वस्तीवरील शेतकºयांना टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. शासनाने या सर्व परिस्थितीचा विचार करून त्या प्रमाणात वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी वाटप करणे गरजेचे आहे.
परंतु टँकर चालक शेतकरी, महिला यांच्यावर आरेरावीची भाषा वापरून पाणी वाटप करतांना प्रत्येकांशी हुज्जत घालतो अशी ओरड आहे. त्यामुळे सदर टँकर बदलून मिळावा आशी मागणी होत आहे. गावची लोकसंख्या विचारात घेता एका टँकरचे पाणी अपूर्ण पडत असल्याने वाडी-वस्त्यांवर पिण्याचे पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. बहुतेक शेतकºयांचे घर हे त्याच्या शेतात असल्याने शासनाने वाडी-वस्तीवर दुसरा नवीन टँकर सुरु करावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणी पंचायत समिती सभापती यांच्याकडे ममदापूरच्या ग्रामस्थांनी तक्र ार केली आहे. टँकर चालकाच्या अरेरावीला नागरिक वैतागले असून दुसरा टँकर सुरू करावा अशी मागणी होत आहे. (फोटो १४ वॉटर शॉर्टेज)