दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी ओढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:33 IST2019-10-13T00:32:25+5:302019-10-13T00:33:25+5:30
जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले.

दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी ओढले
नाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले.
जेलरोड जुना सायखेडारोड हॉली फ्लॉवर शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या अनिता भूषण गवळी व त्यांच्या शेजारी राहणाºया स्वाती झांबरे या गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अभिनव शाळेजवळून पायी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी गवळी यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले.
तर दुसºया घटनेत जेलरोड टाकेकर वसाहत श्रीहरी विठ्ठल सोसायटी येथे राहणाºया रत्ना भगवान जाधव या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाकेकर वसाहत येथे भाजीपाला घेऊन रस्त्याने घरी जात होत्या. सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर उभ्या असलेल्या दोघा चोरट्यांनी जाधव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरून नेले.