तरसाळीच्या सरपंचपदी मंगलाबाई मोहन बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:46 IST2021-02-12T21:57:46+5:302021-02-13T00:46:49+5:30
सटाणा : तालुक्यातील तरसाळीच्या सरपंचपदी मंगलबाई मोहन तर उपसरपंचपदी काळू पिंपळसे यांची शुक्रवारी (दि.१२) बिनविरोध निवड करण्यात आली.

तरसाळीच्या सरपंचपदी मंगलाबाई मोहन बिनविरोध
सटाणा : तालुक्यातील तरसाळीच्या सरपंचपदी मंगलबाई मोहन तर उपसरपंचपदी काळू पिंपळसे यांची शुक्रवारी (दि.१२) बिनविरोध निवड करण्यात आली.
तरसाळी येथील सरपंच, उपसरपंचपदासाठी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मेधने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सरपंचपदासाठी मंगलबाई मोहन तर उपसरपंचपदासाठी सर्वानुमते काळू पिंपळसे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. या प्रक्रियेत विरोधी गट पूर्णपणे तटस्थ राहिल्याने सरपंचपदी मंगल मोहन तर उपसरपंचपदी वीर एकलव्य संघटनेचे काळू पिंपळसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. या निवडीनंतर थोर महापुरुषांच्या प्रतिमापुजन करण्यात आले, समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली.
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राकेश रौंदळ, प्रभाकर पवार, लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली समर्थ ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलने अपेक्षेनुरूप सलग दुसऱ्यांदा बाजी मारली असून या निवडणुकीत सत्ताधारी गटाला ६ तर विरोधी गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. यानंतर निघालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणातही पुन्हा एकदा या गटाला नशिबाची साथ मिळाली असून सरपंचपद ना.म.प्र.ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाले आहे. आरक्षित एकमेव जागा ही मंगलबाई मोहन यांच्या रूपाने या गटाकडेच असल्याने मोहन परिवाराला तब्बल चाळीस वर्षानंतर गावाचे सरपंचपद मिळाले आहे. निवडणूक कामी तलाठी स्नेहल अहिरे, ग्रामसेवक एन. एम. देवरे, कर्मचारी विजय रौंदळ, बाळा सोनवणे, मोठाभाऊ बागुल आदींनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लखन पवार, नामदेव बोरसे, निंबाबाई माळी, कमल गांगुर्डे आदींसह तात्याजी रौंदळ, मन्साराम जाधव, सुरेश रौंदळ, प्रभाकर पवार,राकेश रौंदळ,अरूण मोहन, भिका रौंदळ, रामदास पवार, खंडू मोहन, प्रकाश मोहन, रोहिदास सोनवणे, शिवाजी सोनवणे, शामा पिंपळसे, देवाजी वाघ, त्र्यंबक गांगुर्डे, विठोबा पिंपळसे, प्रभाकर रौंदळ, यादू चव्हाण, जिभाऊ माळी, साहेबराव रौंदळ, विजय पवार, सुरेश पिंपळसे, गोपिनाथ मोहन,पुंडलिक रौंदळ, रमेश मोहन, जयराम मोहन, बापु वाघ, भैया वाघ, बाळू मोहन, निखिल जाधव, किरण जाधव, रोहीत पवार, नानाजी पवार, मुन्ना जाधव, गणेश रौंदळ, सुरेश पवार, संजय पवार, रविंद्र पवार, मिना पवार, रत्ना जाधव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.