माणकेत भांडणाच्या वादातून घर पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 23:19 IST2021-08-25T23:19:01+5:302021-08-25T23:19:28+5:30

मालेगाव: तालुक्यातील माणके येथे मागील भांडणाच्या वादातून घरात प्रवेश करून घर पेटवून दिल्याप्रकरणी सुरेश अशोक देवरे (रा. माणके) यांच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manek set the house on fire due to a quarrel | माणकेत भांडणाच्या वादातून घर पेटवले

माणकेत भांडणाच्या वादातून घर पेटवले

ठळक मुद्देसंसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

मालेगाव: तालुक्यातील माणके येथे मागील भांडणाच्या वादातून घरात प्रवेश करून घर पेटवून दिल्याप्रकरणी सुरेश अशोक देवरे (रा. माणके) यांच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजनाबाई प्रकाश देवरे (६५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादी व आरोपी भाऊबंद असून त्यांचा शेतीच्या बांधावरून वाद सुरू आहे. संशयित सुरेश देवरे याने फिर्यादीच्या घरात घुसून त्यांचे घर जाळून टाकल्याने फिर्यादीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास जमादार राजपूत करत आहेत.

Web Title: Manek set the house on fire due to a quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.