८४ वर्षांत पहिल्यांदाच मांडवड ग्रामपंचायत बिनविरोध आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 08:42 PM2021-01-05T20:42:40+5:302021-01-06T00:54:11+5:30

मांडवड : तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतही स्थानिकांच्या विचार-विमर्शाने गेल्या ८४ वर्षांत पहिल्यांदाच बिनविरोध करून आदर्श निर्माण केला आहे.

Mandwad Gram Panchayat for the first time in 84 years without any objection | ८४ वर्षांत पहिल्यांदाच मांडवड ग्रामपंचायत बिनविरोध आदर्श

८४ वर्षांत पहिल्यांदाच मांडवड ग्रामपंचायत बिनविरोध आदर्श

googlenewsNext

मांडवड ग्रामपंचायतीला जवळ असलेले पिंजरवाडी गाव जोडलेले आहे. तेथील दोन सदस्य हे मांडवड ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करतात. असे असतानादेखील मांडवड व पिंजरवाडी येथील स्थानिक नेतृत्व असणारे विठ्ठल आबा आहेर, चंद्रसेन आहेर, सुशील अंबेकर, उमाकांत थेटे अशोक निकम, राजू आहेर, योगेश आहेर, सर्जेराव थेटे,रामशिंग पिंगळे, पांडुरंग आहेर, सुदाम आहेर, बाबूराव आहेर, त्र्यंकक आहेर, आनंदा आहेर, रंगनाथ पिंगळे, दोधा पिंगळे, सुपडू पिंगळे, नरहरी थेटे, दत्ता निकम त्याचप्रमाणे पिंजरवाडी येथील कारभारी पाटील, उदय पाटील, भगवान पाटील, शंकर पाटील, आरीफ मन्सुरी, मुनवर सुलताना, समध मन्सुरी, बबन माळवे यांनी विचार-विनिमय करून दोन्ही गावांतील ग्रामपंचायत उमेदवार हे बिनविरोध निवडून द्यावे असे ठरवले.
बिनविरोध उमेदवार
मांडवड ग्रामपंचायतीला बिनविरोध निवड झालेले उमेदवार- मयूर संजय आहेर, सविता भरत आहेर, ऋतुजा सुबोध थेटे, रोशन लक्ष्मण आहेर, सरला सोमनाथ नाझरकर, शोभा देवीदास आहेर, जिजाबाई विठ्ठल आहेर, ज्योती दत्तात्रय निकम, अंकुश हरी डोके, विजय गवरचंद पाटील, आणि सविता मच्छिंद्र जगताप अशा अकरा उमेदवारांची मांडवड व पिंजरवाडी या दोन्ही गावांनी बिनविरोध निवड केली आहे.

Web Title: Mandwad Gram Panchayat for the first time in 84 years without any objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.