मंडेला शांतता पुरस्कार धायगुडे यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 00:45 IST2021-01-30T22:58:54+5:302021-01-31T00:45:35+5:30

नाशिक : नेल्सन मंडेला नोबल पीस अकॅडमीच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा मालेगावच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. मधु कृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Mandela awarded the Peace Prize to Dhaygude | मंडेला शांतता पुरस्कार धायगुडे यांना प्रदान

मंडेला शांतता पुरस्कार धायगुडे यांना प्रदान

ठळक मुद्देकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि डॉ. विजयकुमार शहा उपस्थित

नाशिक : नेल्सन मंडेला नोबल पीस अकॅडमीच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा मालेगावच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. मधु कृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि डॉ. विजयकुमार शहा उपस्थित होते.
मालेगावच्या आयुक्तपदी कार्यरत असताना श्रीमती धायगुडे यांनी त्या शहरात शांतता आणि सलोखा कायम राखण्यात बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांना गौरविण्यात आले. तसेच प्रशासकीय कामकाजाद्वारे त्यांनी केलेल्या कार्याचादेखील यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उपस्थिती होती.
 

Web Title: Mandela awarded the Peace Prize to Dhaygude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.