शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

गुणपत्रक अपलोड करणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:29 IST

नाशिक : दहावीचा निकाल जाहीर होताच शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसंदर्भात आॅनलाइन सादर करण्याच्या कागदपत्रांविषयी महत्त्वाची सूचना केली असून, त्यानुसार अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आॅनलाइन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर माध्यमिक शाळा सोडल्याच्या दाखल्यासह अन्य विविध प्रकारचे कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश : अन्य कागदपत्रांसाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहावीचा निकाल जाहीर होताच शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसंदर्भात आॅनलाइन सादर करण्याच्या कागदपत्रांविषयी महत्त्वाची सूचना केली असून, त्यानुसार अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आॅनलाइन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर माध्यमिक शाळा सोडल्याच्या दाखल्यासह अन्य विविध प्रकारचे कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.कोरोनाच्या उद््भवलेल्या परिस्थितीमुळे या वर्षीच्या अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी सादर करायच्या विविध प्रमाणपत्रांबाबत उपसचिव राजेंद्र पवार यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षण संचालकांना पत्र पाठवून नव्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना केवळ दहावीचेच आॅनलाइन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक करण्यात यावे, ज्या विद्यार्थ्यांकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (एनसीएल) ही प्रमाणपत्र उपलब्ध असतील.असे विद्यार्थी ही प्रमाणपत्रे अपलोड करू शकतील, मात्र ही प्रमाणपत्रे अपलोड करणे बंधनकारक करण्यात येऊ नये, त्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. क्रीडा प्रावीण्य, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ प्रमाणपत्र व बदली आदेश आदी समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे किंवा ही प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अजार्ची प्रत विद्यार्थ्यांना अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक राहणार आहे. प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी काही तांत्रिक बाबीमुळे सादर न केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेण्यात यावे.विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यावी तसेच अकरावीसाठी विद्यार्थ्यांनादेण्यात येणारा प्रवेश हा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या माहितीच्या व हमीपत्राच्या आधारे देण्यात येणार आहे.अचूक व योग्य कागदपत्रे सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असल्याचे संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासंबंधीच्या सूचना उपसचिव कार्यालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना केली आहे.

टॅग्स :Schoolशाळाssc examदहावी