आखाडातून मांडले फोगाट यांचे जीवन

By Admin | Updated: June 11, 2017 00:33 IST2017-06-11T00:33:21+5:302017-06-11T00:33:31+5:30

नाशिक : कुस्ती या क्रीडाप्रकारात भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक सुवर्णपदके मिळवावीत यासाठी फोगाट यांनी आपले आयुष्य वाहून घेतले होते

Mandalay Fogat's life from the Akhada | आखाडातून मांडले फोगाट यांचे जीवन

आखाडातून मांडले फोगाट यांचे जीवन

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महावीरसिंग फोगाट यांचे जीवन असामान्य, जिद्दी आणि मेहनती होते. कुस्ती या क्रीडाप्रकारात भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक सुवर्णपदके मिळवावीत यासाठी फोगाट यांनी आपले आयुष्य वाहून घेतले होते. या आणि अशा फोगट यांच्या आयुष्यातील विविध पैलू अनुवादक लीना सोहोनी यांनी ‘अनुभव अनुवादाचे’ या कार्यक्रमात शनिवारी (दि. १०) उलगडून सांगितले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील विशाखा सभागृहात आयोजित या कार्यक्रमात सौरभ दुग्गल लिखित आणि लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेल्या ‘आखाडा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लीना सोहोनी यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ‘अनुभव अनुवादाचे’ या कार्यक्रमात स्वानंद बेदरकर यांनी लीना सोहनी यांच्याशी संवाद साधला. भारतातून कुस्ती क्रीडाप्रकारात अधिकाधिक खेळाडू घडावेत यासाठी त्यांनी आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात के ली. यासाठी त्यांनी आपल्या घरातच कुस्तीचा आखाडा तयार केला हे सांगताना फोगाट यांच्या कडक शिस्तीचे अनेक दाखले यावेळी दिले. फोगाट हे अत्यंत कठोर आणि निग्रही होते आणि त्यांच्या या स्वभावाचा त्यांच्या मुलींवर योग्य संस्कार झाला, असेही सोहोनी यांनी अधोरेखित केले. ‘आखाडा’ या पुस्तकातून फोगाट यांचा कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक प्रवास उलगडून सांगताना प्रत्येक टप्प्यावर संघर्ष असला तरी त्यांनी कधीही हार मानली नाही, असेही त्यांनी सांगितले.‘

Web Title: Mandalay Fogat's life from the Akhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.